शिक्षण व्यवस्थेमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्या सर्व बदलांची माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. आपला अनमोल वेळ खर्च करून आपण ब्लॉग ला भेट दिली. आपले मनापासून धन्यवाद! अमर देवाळकर

सरल

  २ कोटी २४ लक्ष विदयार्थ्यांपैकी २ कोटी २० लक्ष ३९ हजार विदयार्थ्याचा डाटा गोळा झालाआहेयापैकी ४७% विदयार्थ्यांचा डाटा मॅच झाला आहे. १ ते ८ चे सर्व विदयार्थी RTE अन्वये पात्र झाल्याचे गृहीत धरून त्या सर्व विदयार्थ्यांना प्रमोट करण्याचा शासनाने  निर्णय घेतला. वर्ग ९,१० व ११ च्या विद्यार्थ्यांना मॅन्युअली पुढील  वर्गात प्रमोशन दयावे लागतील. पुढील वर्षात सर्व चाचण्यांचा निकाल ऑनलाइन घ्यावा लागेल.student portel च्या अधिक विस्तृत्व माहितीसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण पुणे येथे झाले.         तसेच विभागीय प्रशिक्षण अमरावती येथे दिनांक १३ जुलै २०१६ ला झाले. तालुक्यातील सर्व माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिले जाईल. Student Portel वर सध्या प्रामुख्याने ऑनलाइन टि.सी. ट्रान्सफर  चे काम करायचे आहे.त्यासाठी खालील काही महत्वाच्या सुचना  student.maharashatra.gov.in      यावर लॉगीन करावे.साईड वर माहितीकरीता मराठी व इंग्रजी भाषेमध्ये मेन्यूअल दिले आहे. त्यात संपूर्ण माहिती विस्तृत्वपणे दिली आहे.ऑनलाइन टि.सी. ट्रान्सफर साठी Request - Conform - Update  या तीन पातळीवर आधारीत ही प्रक्रिया असणार आहे. 

Request - विदयार्थी ज्या शाळेत गेला असेल त्या (विदयार्थ्याची नवीन शाळा) शाळेच्या मु.अ. ने Request Form भरावा.- Request Form भरण्यासाठी विदयार्थ्याच्या जुन्या शाळेचा U- DISE कोड, वर्ग, जन्म तारीख टाकून सर्च केल्यानंतर वर्गानुसार विदयार्थी यादी उपलब्ध होईल.- ज्या विदयार्थ्याचा दाखला हवा असेल त्या विदयार्थ्याच्या नावासमोर असलेल्या चेकबॉक्स वर क्लीक  करावे.- त्यानंतर तसा SMS जुन्या शाळेच्या मुख्याध्यापकाला जाणार आहे.

Conform -ज्या शाळेतून दाखला दयायचा आहे (विदयार्थ्याची जुनी शाळा) त्या शाळेच्या मु.अ. नी Request Confirmation करायची आहे. यासाठी Transfer Conformation Option निवडावा

Update -Request Confirmation नंतर नवीन शाळेच्या मु.अ. नी सदर विदयार्थी माहिती अपडेट करायची आहे.- जसे वर्ग, तुकडी, जनरल रजिष्टर क्रमांक अपडेट करुन घ्यावे. महत्वाच्या बाबी -एका विदयार्थ्यासाठी एकच Request चा स्विकार केल्या जाईल Request पाच ते सात दिवसात Confim न केल्यास ती BEO लॉगीन ला जाईल.BEO कडून ती Conform करावी लागेल. चुकीने टाकल्या गेलेली Request BEO लॉगीन वरून Reject करावी लागेल.विदयार्थ्याला मिळालेला ID त्याच्या शालेय जीवणापर्यंत कधीही बदलला जाणार नाही. त्याची शाळा बदलली तरीही..  बाहेरील राज्यातून आलेल्या विद्यार्थ्याची डेटा एन्ट्री नवीन करावी लागेल. ज्या विद्यार्थ्याचे नाव Online Transfer प्रोसेसमध्ये दिसत नाही अशा विदयार्थ्यांचे Online Transfer नविन डेटा एन्ट्री लॉगीन उपलब्ध झाल्यावर करता येईल. ऑनलाइन माहिती मध्ये एका पेक्षा जास्त वेळा नोंद झालेला विदयार्थी (Duplicate) डिलीट करण्यासाठी नंतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . त्यामूळे Online Transfer च्या वेळी अशा प्रकारचा विदयार्थी असेल तर सदर विदयार्थ्याची (duplicate ) नोंद डिलीट करावी.  Online Transfer सोबत शाळेकडून दिला जाणारा दाखला देखील महत्वाचा आहे.        सरल बाबत महत्वाची माहिती 
@@विद्यार्थी ट्रान्सफर request करत असताना जर ज्या विद्यार्थ्याची request करायची होती त्याची request न करता भलत्याच विद्यार्थ्याची request केली गेली असेल तर सदर request जुन्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.तसा अधिकार त्यांना देण्यात आलेला नाही.तो अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेला आहे.परंतु त्यासाठी अशी चुकीची request आली की अशा शाळेने 7 दिवस  त्या request ला कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही .7 दिवसानंतर अशी request ही मुख्याध्यापकांच्या लॉगिन मधून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आपोआप ट्रान्सफर केली जाईल .गटशिक्षणाधिकारी सदर request ची शहानिशा करून रिजेक्ट किंवा ट्रान्सफर करू शकतात.परंतु एखाद्या शाळेने जर चुकून अशा चुकीच्या मुलाची आलेल्या request ला कन्फर्म केले असेल तर मात्र सदर विद्यार्थी हा सदर शाळेला ट्रान्सफर होतो.खर तर ही दोन्ही शाळेची चूक आहे.परंतु गडबडीमध्ये असे होऊ शकते.अशा वेळी सदर विद्यार्थ्याची माहिती पुन्हा त्याच्या मूळ शाळेत परत पाठवणे क्रमप्राप्त आहे हे लक्षात घ्यावे.परंतु या स्टेज ला सदर विद्यार्थी त्या शाळेला रिजेक्ट करता येत नाही.यासाठी ज्या शाळेत सदर विद्यार्थी ट्रान्सफर झाला आहे त्या शाळेने तात्पुरत्या स्वरूपात तो विद्यार्थी डमी माहिती भरून update करावा जेणेकरून ऑनलाइन माहिती मध्ये तो विद्यार्थी आता नवीन शाळेचा विद्यार्थी आहे असे दिसून येईल आणि आता मूळ शाळेला पुन्हा ज्या शाळेने सदर विद्यार्थी update केलेला आहे त्या शाळेला नव्याने request पाठवा आणि सदर विद्यार्थी नेहमीच्या प्रोसेस ने आपल्या मूळ शाळेत add करून घ्या.अशा वेळी दोन्ही मुख्याध्यापकाने एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे आणि त्यांनी ते वेळेत करावे ही विनंती.अशा केस मध्ये कोणत्याही मुख्याध्यापकांच्या हलगर्जीपणामुळे जर विद्यार्थ्यांच्या अपूर्ण आणि चुकीच्या ऑनलाइन माहितीमुळे जर काही समस्याच निर्माण झाली तर दोन्ही मुख्याध्यापाकास जबाबदार धरले जाणार आहे याची नोंद घ्यावी.
यासाठी विद्यार्थी request करताना खालील प्रकारे काळजी घ्यावी
1) विद्यार्थी request करत असताना नवीन शाळेने ट्रान्सफर बटन क्लीक करण्यापूर्वी आपण योग्य विद्यार्थ्यालाच सिलेक्ट केले आहे का ते पहावे.


2) आपणास एखाद्या शाळेची विद्यार्थी ट्रान्सफर request आलेली असेल त्या request ला कन्फर्म करण्यापूर्वी सदर विद्यार्थी आपल्या शाळेतून खरोखर ट्रान्सफर झाला आहे का,ज्या शाळेत ट्रान्सफर झाला आहे त्याच शाळेची request आलेली आहे का ही दाखला मागणी file मध्ये चेक करून मगच सदर विद्यार्थी ट्रान्सफर request कन्फर्म करावी.अन्यथा अशा चुकीच्या request ला काहीच प्रतिसाद देऊ नये.


3) जर आपल्या शाळेत आलेली request मुख्याध्याकाने वेळेत म्हणजेच 7 दिवसात कन्फर्म केली नाही तर ती request कन्फर्म करण्यासाठी beo यांच्या लॉगिन ला जाते.त्यामुळे कामात हलगर्जीपणा अथवा ही बाब वेळेत माहिती न झाल्यामुळे या सर्व request ह्या beo यांच्या लॉगिन ला गेल्या आहेत.अशा request ची संख्या beo यांच्या लॉगिन ला हजारामध्ये आहेत.त्यामुळे मुख्याध्यापकांनी करावयाचे काम हे गटशिक्षणाधिकारी यांना करावे लागत आहे.हे करत असताना  जशी मुख्याध्यापकाला त्या मुलाबद्दल माहिती असते तशी त्या मुलाबद्दल गटशिक्षणाधिकारी यांना माहिती नसते.म्हणून त्या मुख्याध्यापकाला बोलावूनच सदर काम करावे लागत आहे.म्हणून आता असे होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला या सर्व request ह्या return करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.अशा हजारोने आलेल्या request गटशिक्षणाधिकारी यांनी पुन्हा त्या शाळेला कन्फर्म करण्याकरिता परत करावयाच्या आहेत याची नोंद घ्यावी.ज्या शाळेने request पाठवलेली आहे त्या शाळेने ऑन 7 दिवस विद्यार्थी request कन्फर्म होण्यासाठी वाट पहावी.ज्या request चुकीच्या असल्याने गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिन ला आलेल्या आहेत त्या मात्र शहानिशा करून गटशिक्षणाधिकारी यांनी रिजेक्ट करायच्या आहेतच. गटशिक्षणाधिकारी यांनी request रिटर्न केल्यावर या request कन्फर्म करण्यासाठी जुन्या मुख्याध्यापकाकडे पुन्हा 7 दिवसाचा कालावधी असेल.या 7 दिवसात जर त्या मुख्याध्यापकाने या request कन्फर्म केल्या नाही आणि दुसर्‍यांदा  पुन्हा अशा request गटशिक्षणाधिकारी यांना गेल्या तर मात्र अशा मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.त्यामुळे या सूचनेचा गांभीर्याने विचार व्हावा ही आपल्या बांधवांना नम्र विनंती.


4) काही पालक असे म्हणत असतात की आमच्या मुलाची प्रगती आम्हाला कमी वाटते तेंव्हा आमच्या मुलास या वर्षी नापास करा आणि याच वर्गात बसवा.अशा वेळी हे लक्षात घ्या की rte नुसार आपणास कोणत्याही विद्यार्थ्यास नापास करता येणार नाही.ऑनलाइन सिस्टिम मध्ये देखील तो विद्यार्थी  तुम्हाला मागील वर्गात दाखवता येणार नाही हे लक्षात घ्यावे.अशा वेळी पालकांना समजावे की या वर्षी त्याची आम्ही प्रगती विशेष लक्ष घालून करून घेऊ अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालकांचे मतपरिवर्तन करावे ही विनंती.


5) मागील वर्षी भरलेल्या विद्यार्थी माहिती मध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या दुरूस्त करण्यासाठी आपणास येत्या काही दिवसात सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी.तोपर्यंत ट्रान्सफर आणि update चे काम पूर्ण करून घ्यावे ही विनंती.


6) मागील वर्षी माहिती भरलेल्या विध्यार्थी पैकी काही विद्यार्थी मयत झाले असतील अशा मुलांचे नाव सिस्टिम मधून कमी करण्यासाठी लवकरच सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.याची नोंद घ्यावी.


7) इयत्ता 9  च्या पुढील काही मुले शाळा सोडून गेलेली आहेत, काही मुले दाखला घेऊन गेली आहेत तसेच काही मुले परराज्यात शिकण्यासाठी गेलेली आहेत अशा मुलांचे नावे सिस्टिम मधून कशी कमी करावी याबाबत आपणास लवकरच मार्गदर्शन करण्यात येईल.तोपर्यंत आपण घाई न करता  इतर कामे पूर्ण करून घ्यावेत.


8) विद्यार्थी ट्रान्सफर करताना दुसर्‍या माध्यमातून आला असेल तर update करताना माध्यम बदल करता येते याची नोंद घ्यावी.


9) beo यांच्या लॉगिन मध्ये विद्यार्थी ट्रान्सफर करताना ट्रान्सफर झाला आहे या अर्थाची सूचना येते परंतु प्रत्यक्ष विद्यार्थी मात्र ट्रान्सफर होत नाही अशा तक्रारी येत आहे.त्यांनी हे लक्षात घ्यावे की विद्यार्थी ट्रान्सफर केल्यावर सूचना येते त्यानंतर ok बटन क्लीक करावे आणि  सदर पेज रिफ्रेश करावे त्यानंतर ते नाव आपणास यादी मध्ये दिसणार नाही.


10) ज्या शाळेत नवीन वर्ग अथवा तुकडी निर्माण झालेली आहे अशा शाळांना तो नवीन वर्ग आणि तुकडी add करण्याची सुविधा master या ऑप्शन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी. 


11) मागील शैक्षणिक वर्षांमध्ये भरलेली 1 ते 8 वी च्या विद्यार्थ्याची  माहिती सिस्टिम द्वारे ऑटो अपडेट केलेली आहे.म्हणजेच आता मागील वर्षी माहिती भरलेला विद्यार्थी  जर 1 ली ला असेल तर तो आता 2 री ला दिसून येणार आहे.याचाच अर्थ असा की स्टुडंट ट्रान्सफर करताना आतापर्यंत आपण एखाद्या विद्यार्थ्याला मागच्या वर्षीच्या वर्गात ट्रान्सफर request करण्यासाठी  शोधत होतो ते आता मागच्या वर्गात न शोधता चालू वर्षीच्या वर्गात शोधावे लागणार आहे याची नोंद घ्यावी.परंतु इयत्ता 9 वीच्या पुढील मुलांचे प्रमोशन हे मॅन्युअली करावे लागणार आहे.अशा शाळेत विद्यार्थी ट्रान्सफर request करताना पुढील शाळेने प्रमोशन केले असेल तर चालू वर्गात त्या विद्यार्थ्याला शोधावे अन्यथा मागेल वर्षीच्या इयत्तेमध्ये त्या मुलाला शोधावे लागेल ही बाब लक्षात ठेवावी.


12) सिस्टिम द्वारे ऑटो अपडेशन करताना फक्त 1 ते 8 वीच्याच मुलांचे पुढील वर्गात अपडेशन होईल,मात्र 9 ते 11 वीच्या मुलांचे updation हे मॅन्युअली करावे लागेल हे सर्व मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे.


13) Duplicate students च्या बाबतीत : विद्यार्थी ट्रान्सफर करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतल्या डुप्लिकेट म्हणजेच एकाच विद्यार्थ्याची 2 व 2 पेक्षा अधिक वेळा त्या शाळेत नोंद झाली असेल तर अशा विद्यार्थ्यांच्या अधिकच्या नोंदी सिस्टिम मधून delete करायचे आहे.आपण जर या डुप्लिकेट नोंदी delete केल्या नाही तर beo आणि Eo लेवल वरून सदर नोंदी delete केल्या जातीलच परंतु आपण या नोंदी delete का केल्या नाही यासाठी आपणास जबाबदार धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.कारण या वर्षी होणाऱ्या संच मान्यतेसाठी ही बाब अतिशय महत्वपूर्ण समजली जाणार आहे.तसेच आपल्या शाळेत एखादा विद्यार्थी डुप्लिकेट असेल आणि आपण त्या विद्यार्थ्याच्या अधिक च्या नोंदीला delete केले नसेल तर अशा विद्यार्थ्यास आपणास ट्रान्सफर करता येणार नाही.अशा विद्यार्थ्याची नोंद वरिष्ठ लेवल ला आपोआप सिस्टिम द्वारे कळवली जाईल याची नोंद घ्यावी आणि त्वरित आपल्या शाळेतील डुप्लिकेट स्टूडंट सिस्टिम मधून delete करण्यात यावे.


14) ऑटो प्रमोशन करताना जर एखाद्या शाळेत 1 ते 4 वर्ग असतील अशा शाळेत इयत्ता 4 थी च्या अद्याप इतर शाळेत ट्रान्सफर न झालेले विद्यार्थी सिस्टिम द्वारे त्याच शाळेत निर्माण केलेल्या आभासी 5 वीच्या वर्गात ट्रान्सफर होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ठेवले जाणार आहे.सदर चे विद्यार्थी आपल्या शाळेच्या एकूण पटसंख्येत धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.जेंव्हा या आभासी वर्गातील विद्यार्थ्याची ट्रान्सफर करण्याची request येईल तेंव्हा आपण या विद्यार्थ्यास ट्रान्सफर करू शकाल.अशाच प्रकारे या पद्धतीने पुढील वर्ग नसणाऱ्या शाळांच्या बाबतीत पुढील आभासी  वर्ग सिस्टिम द्वारे  निर्माण करून पुढील इयत्ता नसलेले विद्यार्थी हे अशा वर्गात तात्पुरते ठेवले जाणार आहे.


15) मॅन्युअली प्रमोशन करताना विद्यार्थी अनुत्तीर्ण अथवा absent असूनही जर चुकून पुढील वर्गात प्रमोट झाला तर तर अशा चुकलेल्या प्रमोशन ला आपणास पुन्हा परत (undo) करता येते.


16)तसेच आपल्या शाळेतील 10 वी चे विद्यार्थी 11 वीला न जाता डिप्लोमा अथवा इतर व्यावसाईक शिक्षणास गेले असतील अशा विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदी बाबत देखील काय करायचे हे देखील आपणास लवकरच कळवले जाईल. 



                                श्री. महेश पठाडे  स. अ.                                                जि. प. व. प्रा. डिजीटल शाळा पिसगाव, पं. स. मारेगाव