शिक्षण व्यवस्थेमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्या सर्व बदलांची माहिती देण्याचा माझा प्रयत्न आहे. आपला अनमोल वेळ खर्च करून आपण ब्लॉग ला भेट दिली. आपले मनापासून धन्यवाद! अमर देवाळकर

सायबर गुन्हे

                   * सौजन्य *
  श्री. गोपाळ मदने  (संगणक अभियंता) 
  मोबाईल क्रमांक - 7020554482
  gopalmadane. blogspot. in
   Twitter-@madanegopal

   सध्या २१व्या शतकात आपण वावरत असताना संगणक व सोशल मीडियाशिवाय पर्याय नाही हे आपण जाणतोच, चांद्यापासून बांध्यापर्यंत सर्वच बाबी ऑनलाइन झाल्या आहेत.नव्हे त्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही. रिलायन्स जिओने नुकतीच अतिशय कमी किंमतीत डाटागिरी सुरु केलीय यापुढेही जाऊन रिलायन्सने बोलणे व संदेश मुक्तमध्ये करून प्रतिस्पर्धी सर्वांनाच झडका दिला आहे,याने इंटरनेट वापरकर्त्याचे प्रमाण अनेकपटींनी वाढणार असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.गुन्हेगारी ही पूर्वापार चालत आली आहे. गुन्हे होऊ नयेत म्हणून सुरक्षेचे उपाय योजावे लागतात. सुरक्षा असली व योग्य काळजी घेतली असली तरी गुन्हेगार हे गुन्हे करतातच. काही गुन्हेगार शोधले जातात तर काही सापडत नाहीत. संगणक व इंटरनेटच्या प्रगतीने इलेक्ट्रॉनिक डाटा ट्रान्सफर केला जातो. तसेच ई-बॅकिंग, पेपरलेस ऑफिस सारखी संकल्पना जेथे महत्त्वाची माहिती ही कागदावर न ठेवता ई-डॉक्युमेंटच्या स्वरुपात असते. अशा या व्यवहारामध्ये संगणक, संगणकांचे नेटवर्क, ईलेक्ट्रॉनिक डाटा स्टोरेज, मेसेजिग पध्दत व इतर संबंधित उपकरणे याला सायबर सोसायटी म्हणतात. या सायबर सोसायटीमध्ये जे गुन्हे होतात त्यांना सायबर गुन्हे असे म्हणतात.
सायबर संबंधीत तुमच्या आमच्या मनातील खालील प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात एकत्र पाहणार आहोत:-
सायबर सिक्युरिटी(Cyber Security) म्हणजे काय? 
क्रिप्टोलॉजी/क्रिप्टोग्राफी  म्हणजे काय?
 क्रिप्टोलॉजिस्टचे नक्की काम काय? 
क्रिप्टोलॉजीचे महत्व व वापर कुठे/कसा होतो?
सायबर गुन्ह्यांचे प्रकार कोणकोणते आहेत?
 हॅकिंग करताना दोषी आढळला तर सायबर लॉ काय सांगतो? सोशल मीडियाबद्दल आय-टी कायद्यातील तरतुदी काय आहेत?
 सायबर गुन्हे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपाय कोणकोणते आहेत?
सायबर गुन्ह्यासंबंधी तक्रार नोंदविताना पूर्तता करावयाच्या गोष्टी कोणत्या आहेत?
सायबर लॉयरचे महत्व का वाढतेय?
सायबर गुन्ह्यात दिवसेंदिवस का वाढ होत आहे?या बाबी टाळल्या जाऊ शकतात का?
देशातील सायबर गुन्ह्यांची नोंद ठेवणारा नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल(आकडेवारी) काय सांगतो?


      खरतंर सायबर संबधित असे शेकडो प्रश्न उपस्थित होतील पण आपण एवढ्या बाबींवर बोललो तरी खूप आहे. सायबर नेट,सायबर स्पेस,सायबर क्राईम,सायबर सिक्युरिटी असे शब्द आपण सर्रास ऐकतो पण याबाबींची तीव्रता आपल्याला माहिती नसते, सायबर सिक्युरिटी व याला संलग्न असणाऱ्या बाबींवर आपण प्रकाश टाकणार आहोत. “संगणकावर होणारा गुपचूप हल्ला किंवा अनधिकृत घटकांकडून झालेली संगणकप्रणालीची अतोनात हानी आणि त्याचेच संरक्षण म्हणजे सायबर सेक्युरिटी(Cyber Security) होय.”



पण सुरुवातीला आपण ‘क्रिप्टोग्राफी’बद्दल बोलूयात……… 

क्रिप्टोग्राफी म्हणजे काय?
   क्रिप्टोग्राफी ही लेखनातील एक सांकेतिक लिपी आहे. ही लिपी महत्त्वाचे वा गुप्त लेखन लपवून ठेवण्यासाठी वापरली जाते. क्रिप्टोग्राफीलाच मराठीत कूटलेखन असेही म्हणतात.या शब्दाचा अर्थ लपलेला वा लपवलेला असा होतो. याचाच अर्थ क्रिप्टोग्राफी म्हणजे एखाद्या लपवलेल्या वा गुप्त माहितीचा अभ्यास असा होतो. आधुनिक काळात क्रिप्टोग्राफी किंवा कूटलेखन हे गणित किंवा विज्ञानाची एक शाखा आहे असे मानले जाते. क्रिप्टोग्राफी हा सूचना सिद्धांत, संगणक संरक्षण आणि इंजिनिअरिंगशी खूप मिळते-जुळते आहे. प्रगत देशांमध्ये एटीएम कार्ड आणि काँप्युटर पासवर्ड इत्यादीसाठीही क्रिप्टोग्राफी तंत्र वापरले जाते. याशिवाय स्टेनोग्राफी हे तंत्र क्रिप्टोग्राफीचेच विकसित रूप आहे. क्रिप्टोग्राफीचा जास्तीत जास्त वापर हेरगिरी करण्यासाठी, सैन्याला संदेश पाठवण्यासाठी आणि राजकीय संभाषणांसाठी केला जातो. सैन्याचे गुप्त संदेश एकमेकांना पाठवण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो. सध्याचा काळ हा ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ आहे. या काळात एखादी महत्त्वाची सूचना वा माहिती त्या देशाच्या आर्थिक वा सामाजिक जीवनावर खूप खोल परिणाम करू शकते. औद्योगिकीकरणामुळे हेरगिरी करण्याच्या पद्धतीही खूप आधुनिक झाल्या आहेत. सायबर स्पेसमध्ये असलेल्या सूचना हॅकिंग तंत्राद्वारे चोरली जाण्याची शक्यता असते. सांकेतिक भाषेचे वाढते महत्त्व व ज्ञानाधारित समाज निर्मितीची गरज या गोष्टींमुळे क्रिप्टोग्राफी या तंत्राचे महत्त्व खूप वाढले आहे. आपले संदेश गुप्त ठेवून एखाद्या देशाचे संदेश हॅक केल्याने त्या देशाला नामोहरम करण्याची संधीच विरुद्ध देशाला मिळते. यासाठी क्रिप्टोग्राफी हे प्रभावी हत्यार आहे.
क्रिप्टॉलॉजिस्ट म्हणजे काय?
      एखाद्या महत्त्वाच्या सांकेतिक माहितीचा अर्थ शोधून ती आपल्या भाषेत भाषांतरित करणार्या व आपली माहिती सांकेतिक भाषेत म्हणजे क्रिप्टोग्राफीमध्ये सुरक्षित करणार्या अधिकार्याला क्रिप्टॉलॉजिस्ट असे म्हणतात. क्रिप्टॉलॉजी ही सरकारी व लष्करी विभागातर्फे मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी पद्धत आहे. किंबहुना लष्करी विभागच या तंत्राचा जास्तीत जास्त वापर करतो. लष्करी विभाग क्रिप्टॉलॉजिस्टच्या मदतीने परभाषेतील सांकेतिक माहिती वाचण्यासाठी केला जातो. विविध बँका आपल्या ग्राहकांचे अकौंट क्रेडिट कार्ड सुरक्षित करण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. त्याचबरोबर अनेक ई-कॉमर्स कंपन्या आपल्या ग्राहकांचे अकाउंट्स सुरक्षित करण्यासाठी या तंत्राचा वापर करतात. ऑनलाईन काही सर्च करताना, नेट बँकिंगचा वापर करताना किंवा ऑनलाईन पैशांची देवाणघेवाण करताना लागणार्या वैयक्तिक कोड किंवा पासवर्डचे अल्गोरिदम तयार करण्याचे काम क्रिप्टॉलॉजिस्ट करतो. शासकीय कागदपत्रे व वैयक्तिक माहिती सुरक्षित करणे इतकेच क्रिप्टॉलॉजिस्टचे काम नाही, तर बाजारातील विविध कंपन्यांच्या आर्थिक उलाढालींचा आलेख दाखवणार्या गणिती तक्त्याचे आरेखनही क्रिप्टॉलॉजिस्ट करतो. त्याचबरोबर कंपनीच्या आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य वेळ व योग्य पर्याय कुठला आहे, हे सांगण्याचे कामही क्रिप्टॉलॉजिस्ट करतो. त्याचबरोबर गेम, वेगवेगळ्या प्रकारचे कंप्युटर प्रोग्राम इत्यादींमधील मोठ्या प्रमाणातील सांकेतिक माहिती वाचण्याचे व तिचे भाषांतर करण्याचे काम क्रिप्टॉलॉजिस्टच करतो. क्रिप्टॉलॉजिस्ट फक्त सांकेतिक भाषा ओळखण्याचेच काम करत नाही, तर सांकेतिक भाषा तयार करण्याचेही काम करतो. लष्करी गुप्त माहितीचे सांकेतिक भाषेत रुपांतर करणे, शासनाची माहिती सुरक्षित ठेवणे, वैद्यकीय व इतर गुप्त माहिती संकेतबद्ध करणे व देशातील नागरिकांची विविध प्रकारची वैयक्तिक माहिती संकेतबद्ध करणे इत्यादी कामेही क्रिप्टॉलॉजिस्ट करतो.
क्रिप्टॉलॉजिस्ट कुणासाठी काम करतो?
          क्रिप्टॉलॉजिस्ट गूगल, मायक्रोसॉफ्ट, आणि एओएल अशा विविध कंपन्यां लष्कर विभाग, सरकारी संस्था, ऑनलाईन विक्री करणार्या कंपन्या, पोलीस, गुप्तचर संघटना  यासर्वांना क्रिप्टॉलॉजिस्टची आवश्यकता असते. क्रिप्टॉलॉजिस्ट हा विविध नावांनी ओळखला जातो,क्रिप्टॅनालिस्ट, क्रिप्टोग्राफर, क्रिप्टॉलॉजिक टेक्निशिअन, क्रिप्टॉलॉजिक लिन्ग्वस्टि, सिंबॉलिस्ट, डेसिफरर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी एक्सपर्ट, इंटेलिजन्स एजंट किंवा ऑफिसर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इंजिनिअर !
आता सायबरबद्दल बोलू……….

सायबर गुन्हा :
         सायबर गुन्हा ह्या पारंपारिक गुन्ह्याप्रमाणेच असतो फक्त तो सायबर स्पेस मध्ये इलेक्ट्रॉनिक व संगणकीय वातावरणात केलेला असतो. म्हणून त्यास सायबर गुन्हा (Cyber Crime) म्हणतात. संगणकीय क्षेत्रांमध्ये केलेल्या अपराधांना किंवा गुन्ह्यांना सायबर गुन्हे किंवा सायबर क्राईम असे म्हणतात. 
सायबर गुन्हेगार :
     सायबर गुन्हे करणा-यांना सायबर गुन्हेगार म्हणतात. तंत्रज्ञानाची प्रगती जेव्हा होत असते, त्या वेळेस त्याचे फायदे अनेक असतात. परंतु अशा तंत्रज्ञानाचा गैरफायदा घ्र्णाअरे, अनैतिक मार्गाचा वापर करणारे किंवा समाजकंटक यांमुळे अनेक धोकेही संभवतात. गुन्हेगारी वृत्तीची माणसे अशा तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक गुन्हे करतात.


सायबर गुन्ह्यांचे प्रकार :

सॉफ्ट्वेअर पायरसी (सॉफ्ट्वेअरची चाचेगिरी) :
   संगणक वापरासाठी संगणकासाठी तयार केलेले कायदेशीर सॉफ्ट्वेअर म्हणजेच लायसेन्स सॉफ्ट्वेअर वापरावयाचे असते. परंतु काहीजण अशी लायसेन्स सॉफ्टवेअर वापरत नाहीत. बेकायदेशीरपणे सॉफ्ट्वेअरची कॉपी करुन वापरण्यास सॉफ्ट्वेअरची चाचेगिरी म्हणतात. कॉपी केलेल्या सॉफ्ट्वेअरला पायरेटेड सॉफ्ट्वेअर म्हणतात. पायरेटेड सॉफ्टवेअर तयार करणे अथवा वापरणे गुन्हा आहे तसेच पायरेटेड सॉफ्टवेअरने डाटा खराब होण्याची भिती असते. 

हॅकिंग :
      हॅकिंग म्हणजे नियमांचे उल्लंघन करणे अथवा बेकायदेशीर पध्दतीचा अवलंब करणे. सायबर गुन्ह्यामध्ये संगणाक, संगणक नेटवर्क अथवा वेबसाईटची सुरक्षितता भेदणे व त्यामधील माहिती बदलणे, चोरणे किंवा संगणक प्रणाली खराब करुन त्यामध्ये बिघाड करणे, यास हॅकिंग म्हणतात.  याच पध्दतीने “क्रकिंग” हाही सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे. यामध्ये सुरक्षिततेचा पासवर्ड क्रॅक केला जातो. म्हणजे पासवर्ड शिवाय संगणाक व संगणक प्रणालीचा वापर करतात ज्या संगणकावरील गोपनीय माहितीची चोरी करावयाची आहे त्यावर रेडीमेड प्रोग्रॅम वापरुन हॅकर हल्ला चढवितात. याच्यामागचा हेतू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी, क्रेडीट कार्डवरील माहिती मिळवून त्या क्रेडीट कार्डच्या अकाऊंटचे पैसे काढून हेणे हा असतो. मोठ्या व्यवसायिकांच्या चोरलेल्या गुप्त व महत्त्वाच्या माहितीचा वापर त्यांना धमकाण्यासाठी व पैसे मिळविण्यासाठी करतात. 
सायबर स्टॉकिंग :
 यामध्ये एखाद्याची माहिती मिळवून त्याला धमक्या देऊन व मेल पाठवून जेरेस आणतात. फोन करुनही त्रास देतात. 
डेनायल ऑफ सर्व्हिस ऍटक :
 (सुविधा नादुरुस्त करणे) यामध्ये नेटवर्कची सुविधा बंद करण्यासाठी नेटवर्कची बॅन्डविडथ फ्लड करतात. असंख्य व फार मोठ्या मेल पाठवून (स्मॅम मेल) मेल बॉक्स भरुन टाकतात. यामुळे नेटवर्कमधील ट्रॅफिक जॅम होते व कम्युनिकेशन थांबते.
व्हायरस डेसीमिनेशन (व्हायरसमुळे विध्वंस):
   व्हायरस म्हणजे संगणकबाह्य सूचना संगणाकात प्रवेश करुन बिघाड करतात, माहितीची नासधूस करतात. अशा संगणक प्रोग्रॅमला व्हायरस म्हणतात. अशा उपयोग संगणक प्रणाली दूषित करुन हेतूपूर्ण नुकसान घडवितात. असे व्हायरस प्रोग्रॅम, संगणकतज्ज्ञ कुहेतुनेच तयार करतात. 
आय.आर.सी.क्राईम (IRC Crime Internet Realy Chat) 
इंटरनेटवर सध्या चेटरुम उपलब्ध आहेत. यामध्ये चॅट करणारी व्यक्ती खोटी माहिती सांगून दुस-याला फसवू शकते. अशा चॅटरुममध्ये खोटी माहिती देऊन इतरांना फसविण्याचे प्रकार अनेक बाढलेले आहेत. अशा चॅटरुममध्ये गुन्हेगारीला आय.आर.सी.क्राईम असे म्हणतात. 
क्रेडीट कार्ड फ्रॉड :
      यामध्ये क्रेडीट कार्डचा बेकायदेशीर वापर करुन खरेदी करण्याचे गुन्हे केले जातात.
नेट एक्स्ट्रॉरशन (Net Extortion)
   कंपनीचा गोपनीय व महत्त्वाचा डाटा चोरी करुन त्यापासून पैसे मिळविले जातात किंवा कंपनीकडूनच पैसे मागितले जातात. 
पिशिंग (Phishing) 
 यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेल पाठवतात व लोकांची पर्सनल माहिती मिळवतात. अनावधानाने मेलला उत्तर देताना बॅक अकाऊंट नंबर, पासवर्ड पाठवला जातो. नंतर गैरवापर करतात.
चाईल्ड पोरनोग्राफी 
   लहान मुलांना फसवून त्यांना बीभत्स चित्र, वाडमय, चित्रफित पाठविल्या जातात. यामध्ये लहान मुलांचे मेल ऍड्रेस मिळवितात. चॅटमध्ये खोटी माहिती सांगून त्यांचा विश्वास संपादन करतात. त्यांना मेलद्वारे बीभत्स गोष्टी दाख्वून समाजामध्ये सगळेपण असेच करतात असे त्या मुलाला सांगून त्याची पूर्ण फसवणूक करतात. त्याचा विश्वास बसल्यानंतर त्याला घराबाहेर भेटण्यास सांगतात. अशा भेटीमध्ये मुलांचा आणखी विश्वास संपादन करुन त्याच्याकडून अनैतिक लैंगिक गोष्टी करवून घेतात. असे अनेक प्रकारचे सायबर गुन्हे अनैतिक लोक करत असतात व याचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा गुन्ह्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे व प्रतिबंधात्मक उपाययोजना केली पाहिजे. 

प्रतिबंधात्मक उपाय:
सोशल मीडियावर फेसबुक,ट्विटरसारख्या संकेतस्थळांवर कोणत्याही नेत्याच्या,धर्माच्या किंवा इतर संवेदनशील बाबींवर आपत्तीजनक पोस्ट/कमेंट करू नका.याने सामाजिक सलोखा बिघडतोच पण भादंवि कलमनुसार तुम्ही तुरुंगात जावू शकता व दंडात्मक कारवाईसुद्धा होऊ शकते.
आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुसऱ्याच्या संगणकावरून करू नका. 
 अनोळखी संकेतस्थळांना भेटी देण्याचे टाळा. 
 चॅट करताना कुठलीही महत्त्वाची माहिती टाइप करू नका. वेब कॅमेरा काम झाल्यावर बंद करा किंवा झाकून ठेवा. 
 संगणक वापरताना जागरूक राहा. अनोळखी व अनावश्यक गेम्स व प्रोग्रॅम लोड करू नका. 
स्पायवेअर व वायरस यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये चांगला अँटी व्हायरस आणि अँटी स्पायवेअर प्रोग्रॅम बसवून घ्या. 
 दर दोन किंवा तीन दिवसांनी संगणकाच्या वापरामुळे जमा झालेली तात्पुरती डाउनलोडेड माहिती व जुनी वेब पेजेस कायमस्वरूपी काढून टाकत चला. 
 पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील.
तुम्ही एखाद्याचे नक्कल करणारे बनावट आयडी बनवून त्या व्यक्तीचे नक्कल करणारे किंवा आक्षेपार्ह पोस्ट सतत टाकले व मूळ व्यक्तीने सायबर विभागाकडे तक्रार केली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते म्हणून अशा बाबी आपण कटाक्षाने टाळाव्यात.
व्हाट्सअँपने आपला फोन नंबर फेसबुकसोबत जोडण्याचा पर्याय दिला आहे पण द्यावा कि नाही हा तुमचा प्रश्न असला तरी मला तरी बाब वाटत नसली तरी असुरक्षित वाटते.
 डेबीट/क्रेडीट कार्डच्या फोटोकॉपीची प्रत द्यावयाची असेल अशा वेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या. 
डेबीट/क्रेडीट कार्ड व अकाऊंटचा तपशील देऊ नका. 
ज्या वेबसाईटच्या माध्यमातून पेमेंट करावयाचे आहे, तिची सुरक्षाव्यवस्था तपासा. 
फोन क्रेडीट/ डेबीट कार्ड व ई-बॅकिंगची माहिती देऊ नका. 
डेबीट/ क्रेडीट कार्ड गहाळ झाल्यास ते रद्द करण्यासाठी तात्काळ अर्ज करा व संबंधित संस्थेला त्याची माहिती द्या. 
अनोळ्खी लोकांबरोबर चॅट करु नका व विश्वास ठेवू नका.
काही ई-मेल अनोळ्खी व्यक्ती अथवा संस्थाकडून येतात. त्या काळजीपूर्वक वाचा.ऍटचमेंटबरोबर व्हायरस येऊ शकतो. 
 अशा ई-मेल माहितीची विचारणा करतात. तेव्हा महत्त्वाची गोपनीय माहिती, पासवर्ड, फोन नंबर देऊ नका.
अश्लील ई-मेल बघू नका, येणाऱ्या लिंकवर क्लिक अजिबात करू नका, दुर्लक्ष करा. 
 नियमितपणे ई-मेल,फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्रामच्या अकाऊंटचा पासवर्ड बदला.
 वायरलेस इंटरनेट राऊटर खिडकी किंवा दरवाज्याजवळ नको.त्याची योग्य जागा म्हणजे हॉलच्या मध्यावर असावी. 
 रेंज निवडताना, इमारत व परिसराचा योग्य विचार करावा. यामध्ये एकूण क्षेत्रफळाच्याअ निम्या क्षेत्रापर्यतच इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल अशी रेंज असावी म्हणजे बेकायशीर वापर करता येणार नाही. 
 इंटरनेट वापरात नसेल तर बंद करावे.
फक्त सुयोग्य व्यक्ती व ऍथोराईजड लॅपटॉपचा वापर होत आहे की नाही हे नेहमी तपासून पहावे. 
 महत्त्वाच्या फाईल्स, फोल्डर्स व गोपनीय माहिती ही फक्त ऍक्सेस असणा-यांना वाप्रुन देतात. यामध्ये इतर कोणी बेकायदेशीर उपयोग करत नाही यावर लक्ष ठेवावे लागते. 
 लॉग डाटा म्हणजे कोणी कोणता संगणक वापरुन इंटरनेट अथवा इन्ट्रानेटचा वापर केला याची नोंद हा लॉग डाटा दररोजच्या दररोज हार्डडिस्कवर बॅक घ्यावा.
 संगणकामधील महत्त्वाचे माहिती नष्ट किंवा खराब करण्यासाठी व्हायरस उपयोग करतात. या पासून सुरक्षा म्हणून चांगल्या प्रतीचे व सतत अपडेट करता येईल असे ऍन्टी व्हायरस प्रोग्रॅम संगणकावर नेहमीच लोड करावे. 
महत्त्वाच्या डाटाचा बॅकअप संगणकामधील हार्डडिस्कवर ठेवावा तसेच सी.डी. रॉमवरही ठेवावा.
 संगणक व नेटवर्कचा ऍडमिनिस्टरचा पासवर्ड कोणालाही देऊ व तो सतत बदलत रहावे. 
 इंटरनेट वापरातून व्हायरस येण्याची शक्यता असते अशा वेळी काळजी घ्यावी. Antiviras चा वापर करावा. 
 दुस-या संगणकाकडून पेन ड्राईव्ह अथवा स्टोरेज उपकरणातून वापरावयाच्या फाइलचे व्हायरस स्कॅनिंग करुन मगच वापराव्यात.
फेसबुक,ट्विटर,इंस्टाग्रामवर वावरत विशेषतः चॅटिंग करताना गोपनीय माहिती उघड करू नका हि बाब अंगलट येऊ शकते!

सायबर गुन्ह्यासंबंधी तक्रार नोंदविताना पूर्तता करावयाच्या गोष्टी :
सर्व्हर लॉगची माहिती.
 वेबसाईट खराब झाली असेल तर त्याची हार्ड व सॉफ्ट कॉपी .
संगणकावरील डाटामध्ये बिघाड झाला असेल तर मूळचा डाटा खराब झालेला डाटा यांची सॉफ्ट कॉपी .
संगणक, नेटवर्क केव्हा, कधी, कोणी वापरले याचा तपशील .
संशयित गुन्हेगारांची यादी .
 ई-मेलचा हेडरचा तपशील.
 ई-मेलची कार्ड व सॉफ्ट कॉपी यासाठी असा मेल, मेल इनबॉक्समधून काढून टाकू नका व तो हार्ड डिस्कवर कॉपी करुन ठेवा.

सोशल मीडियाबद्दल आय-टी कायद्यातील काही तरतुदी: 

माहिती तंत्रज्ञान नियम-2000 आणि सायबर विनियम अपील न्यायाधिकरण (कार्यपद्धती) 2000 हा सायबर कायदा गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून संमत करण्यात आला. गुन्हेगाराचा गुन्हा सिध्द झाल्यावर भारतीय दंडसंहितेप्रमाणे गुन्हेगारास कारावास व दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या ऍक्टमध्ये १० प्रकरणे व चार तपशिलांच्या याद्या समाविष्ट केल्या आहेत.
कलम- 66 अ : एखाद्यास बदनामीकारक, खोडकर संदेश पाठविणे किंवा एखादी खोटी माहिती पसरविणे ज्यामुळे कुणाची अडचण, कुंचबणा होणे. धोका निर्माण होऊन त्रास, मानहानी, इजा होणे. आकस, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते किंवा द्वेषभावना वाढीस लागू शकते किंवा एखाद्या संदेशाचे मूळ स्रोत लपविणे किंवा खोटे भासविणे अशा कृती केल्यास तीन वर्षे कैद आणि दंडाची तरतूद आहे. 
 कलम-66 सी: दुसऱ्याचा पासवर्ड चोरी करणे, त्याच्या परवानगीशिवाय वापरणे, डिजिटल हस्ताक्षर व फिंगर प्रिंटचा गैरवापर यासाठी तीन वर्षे आणि शिक्षा एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.
 कलम- 66 डी : दुसऱ्याचा डुप्लिकेट आयडी, मेल आयडी, प्रोफाइल तयार करणे, वेबपेज चोरी करणे, दुसऱ्याच्या नावाने एसएमएस, फसविण्याच्या हेतूने ई-मेल पाठविणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा आणि एक लाखापर्यंत दंड होऊ शकतो.  
कलम- 66 ई :चोरून कुणाचे अश्लील फोटो, व्हिडिओ तयार करणे व ते इंटरनेटवर टाकणे यामध्ये तीन वर्षे शिक्षा व एक लाखापर्यंत दंडाची तरतूद. 
कलम- 67 बी : चाइल्ड पोर्नोग्राफीमध्ये पाच वर्षे शिक्षा आणि दहा लाखांपर्यंत दंड.
 कलम 67 सी : इंटरनेट, संगणकाचा वापर करणाऱ्या प्रत्येक युजरचे रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक. जर रेकॉर्ड ठेवले नाही तर गुन्हा समजला जाईल. यासाठी तीन वर्षे शिक्षा, एक लाखापर्यंत दंडाची तरतूद.
 कलम- 69 : मोबाईल, सेवा सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी मास्टर की सरकारला देणे बंधनकारक केले आहे. यामध्ये सात वर्षे सक्तमजुरी शिक्षा.


नॅशनल क्राईम ब्युरोचा अहवाल:
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार देशात 2010 ते 2014 दरम्यान सायबरचे 7 हजार 897 गुन्हे दाखल झाले. त्यात 6182 जणांना अटक झाली होती. क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार आयटी ऍक्ट आणि आयपीनुसार 2013 या वर्षात 3 हजार 281 गुन्हे दाखल झाले. त्यात 18 वर्षांपर्यंतचे 660, 18 ते 30 वर्षांपर्यंतचे 1833, 30 ते 45 वयोगटातील 657, 45 ते 60 वयोगटातील 122 आणि 60 वर्षांपुढील 9 आरोपींचा समावेश होता.

देशात 2013 मध्ये सर्वाधिक सायबरचे गुन्हे दाखल झालेले राज्य: 

केरळ-312 ,पश्चिम बंगाल-309,उत्तरप्रदेश-249,मध्यप्रदेश-197,हरियाना-182,राजस्थान-154, महाराष्ट्र-561 ,आंध्रप्रदेश-454,कर्नाटक-437


सायबर लॉयरचे महत्त्व :

           सध्या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सायबर कायद्याचे महत्त्व वाढले आहे. न्यायालयात बाजू मांडण्यासाठी आणि कायदेशीर सल्ल्यांसाठी सायबर लॉयरचे महत्त्व वाढले आहे. संगणक हॅंगिंग, क्रेडिट कार्डाची फसवणूक, ई-कॉमर्स आणि इंटरनेटवर ई-बिझनेसच्या संरक्षणासाठी डिजिटल स्वाक्षरीचे संरक्षण, इन्क्रिप्शन कोड किंवा इलेक्ट्रॉनिक कोड इत्यादींशी जोडलेल्या गुन्हेगारीच्या खटल्यांमध्ये सायबर लॉयर महत्त्वाची भूमिका बजावतात. बौद्धिक संपदा कायदा किंवा कॉपीराइट, सॉफ्टवेअर पेटंट, नेट बॅंकिंग यांसारखी प्रकरणे सायबर लॉच्या मदतीने सोडविली जातात. त्यामुळे देशातील अनेक लॉ स्कूल आणि विद्यापीठांत पदव्युत्तर अभ्यासक्रमात सायबर लॉ शिकविला जात आहे.
       सायबरवर बोलत असताना आपण क्रिप्टोग्राफीवर मुद्दाम नजर टाकली कारण याचा थेट संबंध या गोष्टींशी येतो.थोडक्यात काय सायबर सिक्युरिटी, हॅकिंग,क्रिप्टोग्राफी इत्यादी बाबी एका लेखात पूर्ण करणे केवळ अशक्यच,यावर बोलेल तेवढं कमीच आहे,कारण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हे आपण जाणतोच. धन्यवाद!!